पश्चिम महाराष्ट्र

जिल्हास्तरीय स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण लोणीकंद येथे संपन्न

वाघोली – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे वतीने जिल्हास्तरीय स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथे संपन्न झाले.

या प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे, शिक्षणतज्ञ गोरक्षनाथ झुरुंगे, उपसरपंच ओंकार कंद, विषय तज्ञ सोमनाथ शिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद, सदस्य सोहम शिंदे, ग्रा.पं. सदस्य सागर कंद, राहूल शिंदे, सुधीर कंद, अतुल मगर, मुख्याध्यापक हंबीर लंघे, तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गात शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे व ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रभाकर क्षीरसागर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे सुत्रसंचालन एकनाथ शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सोमनाथ शिवले यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button