पश्चिम महाराष्ट्र

भूमी फाउंडेशनच्या वतीने सिको टूल्स आणि डेल्फिनगन कंपनी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या हस्ते व संस्थापक कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून “लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास” हे ब्रीद वाक्य घेत 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन स्थापित भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकास, विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुली, शेतकऱ्यांच्या गरजू मुलींकरिता उत्कृष्ट कार्य करीत आहे.

दरवर्षी भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था राज्यभरातून वर्धापनदिनी उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दोन कंपन्यांची निवड करीत असते. या सामाजिक संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त यावर्षी सेको टूल्स इंडिया कंपनी आणि डेल्फिनगन कंपनी या दोन पुण्यातील कंपन्यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने देखील या दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवस्थापकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यवस्थापकांनी देखील भूमी फाउंडेशनचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी सदैव आमचा सहभाग आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button