गुन्हे वार्ता

श्री.केदारेश्वर देवस्थान म्हैसगांव येथील मंदिराची घंटा गेली चोरीस

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील श्री. केदारेश्वर देवस्थानाची घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
केदारेश्वर देवस्थान हे म्हैसगांव परिसरातील आणि पंचक्रोशीतील गांव, वाड्यातील भाविकांचे महत्वपुर्ण देवस्थान, श्रद्धास्थान मानले जाते. या देवस्थानची घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेवून पोबारा केला आहे.
अज्ञात चोरट्यांनी देवाच्या मंदिराची घंटा चोरी केल्याची खळबळ जनक माहिती मिळताच समस्थ गांवकरी, माजी सरपंच मोठ्याभाऊ हुलूळे, पूंजाहरी मुसुळे, बाळासाहेब गागरे, पोलीस पाटील पांडूरंग गागरे आदी कार्यकर्त्यांनी केदारेश्वर मंदिराकडे धाव घेतली, परंतु फार उशीर झालेला होता.
यापुढे अशा प्रकारे चोरीच्या घटना घडू नये. त्यासाठी समस्थ गांवकऱ्यांनी, तरूण पिढीने, जागरुक, दक्ष, चोख राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Back to top button