अहमदनगर
भाग्यवंताना सेवा पुर्तीचा मान मिळतोच- ह.भ.प. संभुगिरी महाराज गोसावी
आरडगांव/ राजेंद्र आढाव : प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच असे नाही, पण काही भाग्यवान असे असतात की त्यांना सेवा पुर्तीचा मान मिळतोच त्यातील एक म्हणजे मांजरी हायस्कूल चे घोलप सर…! खर तर गावात नोकरी करणे खुप अवघड असते. पण घोलप यांनी गावातच नोकरी करून ५८ वर्षे सेवा पुर्ण करून सन्मानाने सेवा निवृत्त झाले. आज सर्वच क्षेञातील मान्यवरांनी उपस्थित राहुन सत्कार करणे म्हणजे भाग्यच असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. संभुगिरी महाराज गोसावी यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील चंद्रगिरी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ बाबुराव घोलप यांचा सेवापुर्ती समारंभा प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात हा समारंभ संपन्न झाला आहे. प्रसंगी गोरक्षनाथ घोलप सेवानिवृत्तीनंतर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या प्रसंगी त्यांचा व पत्नी लताताई घोलप यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर डाॅ. तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे, उत्तमराव आढाव, उत्तमराव खुळे, पोपट आढाव, रासपाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, साहेबराव तोडमल, रावसाहेब विटनोर, आशिष बिडगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक बिडगर, कोंडीराम विटनोर, अनिल बानकर, बाळासाहेब विटनोर, शालिनीताई विटनोर, रमेश विटनोर, विलास म्हसे, कृष्णाजी विटनोर, अशोक विटनोर, रावसाहेब विटनोर, चांगदेव घोलप, रखमाजी विटनोर, सर्जेराव पेरणे, तंटामुक्त अध्यक्ष आण्णासाहेब विटनोर, गोरक विटनोर, भाऊसाहेब विटनोर, पिरखाभाई पठाण, सोपान बाचकर, रमेश वारूळे आदिंसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.