औरंगाबाद

दुचाकीची उसाच्या टायर गाडीला धडक; दोनजण गंभीर जखमी

विलास लाटे/पैठण : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव नजीक दुचाकी उसाच्या टायर गाडीला धडकल्याने घडलेल्या अपघातात पैठण येथील संतनगर भागातील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार,२७ रोजी दुपारी घडली. गोकुळ मोताळे (३१) व सोपान दुते (२१) असे जखमींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, गोकुळ व सोपान हे दुचाकी (क्र.एम एच २० ई एक्स १९७३) वरून औरंगाबादच्या दिशेने जात असताना धनगाव नजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या उसाने भरलेल्या टायर गाडीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील गोकुळ व सोपान हे दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच ढोरकीन येथील आपात्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश घोडके यांनी रुग्णवाहिका चालक संदीप घोडकेसह घटनास्थळी धाव घेत जखमीस औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक किरण काळे यांनी तातडीने रुग्णावाहीका बोलावून जखमीस रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button