औरंगाबाद

राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवास काष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट

राहुरी विद्यापीठ – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान संकुल काष्टी, मालेगाव येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिल्लोड जि. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास भेट दिली. यावेळी 25 विद्यार्थी उपस्थित होते. या कृषि महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या दालनासह इतर वेगवेगळ्या दालनांना भेट दिली.
याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन दालनातील विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा प्रसार आपल्या गावातील प्रत्येक शेतकर्यांपर्यंत करावा तसेच या सुधारीत तंत्रज्ञानापासून प्रेरणा घेवून स्वतःचे कृषि उद्योग सुरु करावेत. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या दालनांना भेट देऊन माहिती घेतली. या कृषि महोत्सवाच्या भेटीसाठी कृषि विज्ञान संकुलाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस.पी. सोनवणे व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन लाभले. कृषि विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजीव साठे व क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत कपिले यांनी या कृषि महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना भेट घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button