हरिगाव येथे महंत रामगिरी महाराज यांचे भव्य स्वागत
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथे २२ सप्टेंबर पासून शिव मारुती देऊळ उंदीरगाव आउटसाईट हरेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सांगता सोहळा प्रसंगी श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट मठाधिपती महंत स्वामी रामगिरी महाराज यांचे हरिगाव चर्चगेट जवळ आगमन होताच भव्य रथयात्रेत विराजमान होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, फा फ्रान्सिस ओहोळ, फा संतान रॉड्रीग्ज यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. अनेक भाविकांनी सन्मान करीत चर्चगेट ते शिव मारुती देऊळ पर्यंत भव्य फटाक्यांची आतिषबाजी करीत डीजेच्या तालावर सर्व नाचत होते. महिला फुगड्याचा आंनद घेत, व अनेक मंडळाचे कार्यकर्ते झेंडे घेऊन आनंदाने सहभागी झाले होते.
महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसाद झाला. पारायण सोहळ्यात व्यासपीठ चालक ह.भ.प. माउली महाराज गुंजाळ होते. दि. २२ सप्टेंबर पासून ह.भ.प गोविंद महाराज मलिक, ह.भ.प.प्रतीक्षाताई जाधव, ह.भ.प.विकास महाराज हापसे, ह.भ.प. बाळासाहेब रंजाळे महाराज, ह.भ.प. अमोल महाराज बडाख, ह.भ.प.उत्तम महाराज गाढे. ह.भ.प. माउली महाराज गुंजाळ यांची भक्तिमय कीर्तन झाले. हरिपाठ नेतृत्व सागर महाराज काळे व श्रीहरी तरुण मंडळ आदींनी केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले व परिसरातून असंख्य भाविक सोहळ्यास उपस्थित होते. सहा.पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.