माळी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी अंत्रे यांची निवड
नगर – येथील नक्षत्र लॉन येथे नुकतीच माळी महासंघाची बैठक पार पडली असून या बैठकीत जिल्हा तसेच तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. याच बरोबर राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच किरण पाराजी अंत्रे पाटील यांची माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र अहिल्यानगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच श्री. फुलसौंदर यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे संत सावता महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची एकत्रित प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, डॉ प्रमोद तांबे, राम पानमळकर, जिल्हाध्यक्ष भूषण भुजबळ, राहुल साबळे, नंदकुमार नेमाने, गणेश धाडगे, संदीप दळवी, तुषार फुलारी, यश भांबरकर, आकाश फुले, जयश्री व्यवहारे, राजेंद्र बोरुडे, सुभाष गोंधले, गोरक्षनाथ गाडेकर, विकास रासकर, गणेश पेहरे, सुवर्णा शेलार, छाया चिपाडे, अभिजीत बोरुडे, दिपक साखरे, संजय राउत, कैलास व्यवहारे अनिल अनाप, नरेंद्र अनाप, संतोष अंत्रे यांच्या सह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल किरण अंत्रे यांनी सांगितले की, माळी महासंघाच्या माध्यमातून समाजातील तसेच ओ.बी.सी, मधील वंचित घटकांना न्याय हक्क मिळवून देण्याबरोबरच या घटकांचा सामाजिक, आर्थिक तसेच सामाजिक विकास होण्यासाठी माळी महासंघात कायम कार्यरत राहणार असून ही संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहे. या माध्यमातून कायदा प्रशिक्षण, नेतृत्व, गुणविकास, सामाजिक जनजागृती, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, सामाजिक न्याय इ. बाबतीमध्ये जनजागृती करून संघटनेमध्ये जास्तीत जास्त समाजबांधवांचा व युवकांचा समावेश करून संघटनेचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी नगराध्यक्षा सौ उषाताई तनपुरे, मिलिंद अनाप, सूर्यकांत भूजाडी, सूर्यभान शिंदे, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप, सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, विनोद अंत्रे यांनी अभिनंदन केले.