अहमदनगर
गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्राचे डॉ तन्वीर देशमुख यांचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेकडून सत्कार
राहुरी – येथील गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या सुख, दु:खांची जाणीव असणारे, दिव्यांगांच्या सहकार्यात पाठीशी तन, मन, धनाने आपुलकीने उभे असणारे डॉ.तन्वीर देशमुख यांचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, यशोदाई, भरभराटीच्या, दिव्यांग प्रती असाच स्नेह वृध्दींगत होवो अशा स्वरुपाच्या शब्दसुमनाच्या हार्दीक शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, डॉ तन्वीर देशमुख हे दिव्यांगांसाठी कायमच सामाजिक उपक्रमात सहभागी असतात, सहकार्य करतात, दिव्यांगांच्या उपचारासाठी सवलत देतात. त्या बद्दल त्यांनी प्रहार संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.देशमुख यांनी आभार प्रदर्शित करते समयी मी सदैव दिव्यांगाप्रती सेवेशी असणार आहे. तसेच नवीन वर्षाच्या शुभ मुहुर्तावर दिव्यांगांसाठी सर्व सेवेत 50 % सवलतीच्या दरात सेवा या विषयी मार्गदर्शन केले. हॉस्पिटलला येताना दिव्यांग पेशंट यांनी दिव्यांगप्रमाण पत्र किंवा युनिक कार्डची झेरॉक्स सोबत येताना आणावी असे तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांनी सांगीतले. त्याचबरोबर नुकतेच श्री तिरुपती बालाजींची यात्रा करून सर्व दिव्यांगांना आनंदी रहाण्याचा आशीर्वाद घेवून आलेले आपल्या सुमधूर वाणीने निवेदक म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नावाजलेले बच्चुभाऊ कडूंचे समर्थक जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांचा गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्र, तथा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने डॉ. देशमुख यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगर जिल्हा प्रमुख मधुकर घाडगे, नगर जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष योगेश लबडे, तालुका संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी, राहुरी तालुका सल्लगार सलीमभाई शेख, सचिव दत्ता खेमनर, संघटक भास्कर दरंदले, राहुरी शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले, राहुरी शहर सचिव जुबेर मुसानी, मोरे सर, गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्र सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.