ठळक बातम्या

किल्ले राजगडावर वंशज घराण्याच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

किल्ले राजगड : दि. ०२ जून रोजी शक्तिपीठ दुर्गराज, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, अर्थात गडांचा राजा “किल्ले राजगड” वर समस्त शिव-शंभुभक्त व हिंदू बांधवांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.

या दिव्य सोहळ्यासाठी हजारो शिव शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी शुर सेनापती रणधुरंदर संताजी घोरपडे यांच्या इतिहासावरील चित्रपटाचा बॅनर सर्व सरदार घराण्यातील वंशजांच्या हस्ते प्रकाशित / रिलीज करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तसेच शंभुपत्नी महाराणी येसूबाई साहेब यांचे वडील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज, शभुसेना प्रमुख दिपकजी राजे शिर्के, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सरसेनापती रवींद्रजी कंक, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालजी मालुसरे, सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज सरदार मंगेशराव शिळीमकर, वीर धाराऊ माता गाडे पाटील यांचे पुत्र सरनौबत अंतोजी गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमीत गाडे पाटील, सरदार गोदाजीराजे जगताप यांचे वंशज सरदार मंथनराव जगताप, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार समीरराव इंदलकर आदी थोर राजघराणे व शूरवीर सरदार, मावळ्यांच्या घराण्यातील वंशज मंडळी तसेच राष्ट्रवादी सैनिक सेलचे संदीप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले राजगडावर दुग्धअभिषेक करून महाआरती करण्यात आली. गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button