गुन्हे वार्ता

राहुरी – शिंगणापूर रस्त्यावरील ‘लटकूं’वर पोलिसांची कारवाई

राहुरी | अशोक मंडलिक : शिर्डी- राहुरी- शिंगणापूर रस्त्यावर असणाऱ्या सर्व ‘लटकू’ दलालांवर कायदेशीर कारवाई करून याचा भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

राहुरी शिंगणापूर फाटा उंबरे ब्राम्हणी ते सोनई दरम्यान मोठ्या प्रमाणात लटकू दलालांचा सुळसुळाट असल्यामुळे शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शिंगणापूर फाटा या परिसरात गाड्याला हात करून त्यांना आमच्या दुकानावर शिंगणापूर येथे साहित्य खरेदीसाठी चला तुम्हाला दोनशे ते चारशे रुपये देतो असे वाहन चालकाला विनवणी केली जाते. वाहन चालक नविन असल्यामुळे हे लटकू या वाहनांचा वेगाने पाटला ही करतात. पाटला करताना अनेक वेळा या परिसरात या लटकूंचे अपघात झाल्याने काहींचा जीवही गमावला गेला आहे. शिर्डीहून आलेला प्रत्येक भाविक शिंगणापूरला जात असतो. त्यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते.

राहुरी ते शिंगणापूर फाट्यावर या लटकूच्या २५ ते ३० मोटर सायकली सावजाच्या शोधात उभ्या असतात. राहुरी पोलिसांची लटकूंचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम चालू असून नुकतच पो. कॉ. गायकवाड यांनी लटकूंचा बंदोबस्त करण्यासाठी महेश कदम व राम काते दोघे रा. सोनई या दोन लटकुना पाठलाग करून पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. यापुढे या रस्त्यावर कोणी लटकू आढळल्यास ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क करावा, कुठल्याही भाविकांना याचा त्रास होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाईल, असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button