गुन्हे वार्ता

अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न

राहुरी | शिवाजी दवणे : तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे आपल्या आत्या व बहिणीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी राजन चंद्रकांत सुसे याने अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या तरुणीने राहुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या तरुणाच्या विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354 ड, 363, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, सदर अल्पवयीन तरुणी दोन वर्षांपासून राहुरीतील एका शाळेत शिक्षण घेत आहे. ती तरुणी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना गोटुंबे आखाडा येथील राजन चंद्रकांत सुसे हा तरुण त्या अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करायचा व माझ्या मोबाईलवर कॉल कर अन्यथा तुझ्या बहिणीच्या पतीला जीवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली.

सदरील तरुणीने या तरुणाच्या भीतीपोटी शाळेतील शिक्षकाच्या मोबाईल वरून त्या तरुणास कॉल केला असता त्या तरुणाने तू शाळेबाहेर ये अशी धमकी दिली. ती तरुणी भीतीपोटी काही वेळानंतर शाळेबाहेर आली असता सदरील आरोपी राजन चंद्रकांत सूसे हा आपली ईरटीका गाडी क्रमांक MH17 AJ5707 ही घेऊन शाळेबाहेर उभा होता. ती तरुणी त्याच्या जवळ गेली असता तू माझ्या गाडीत बस म्हंटला, परंतु माझे तास चालू असल्याचे या तरुणीने या तरुणास सांगितले. परंतु राजन सूसे याने या तरुणीला धमकावत तू गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. गाडीत न बसल्यास अन्यथा तुझे दाजी यांना जीवे मारण्याची धमकी या तरुणीला दिली व बळजबरीने गाडीत बसविले व त्याने आपली कार चालू करून राहुरी कॉलेजच्या दिशेने नेली व त्या तरुणीला फूस लावून आपल्याला पळून जायचे आहे असे सांगितले.

परंतु तरुणीने त्या तरुणाला नकार दिल्यानंतर राजन सूसे या तरुणाला कुणाचा तरी कॉल आला. या तरुणाने आपली कार राहुरी कॉलेज परिसरातून मागे फिरविली व सदरील तरुणीस राहुरी बस स्टँड जवळील रिक्षा स्टँड वर सोडले. त्यानंतर तरुणीने तिच्या बहिनीच्या पतीला कॉल करून राहुरीला बोलावून घेतले व घडलेल्या घटनेची आपबिती सांगितली. त्यानंतर ही तरुणी राहुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या तरुणाच्या विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354 ड, 363, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button