गुन्हे वार्ता

मानोरी शिवारात भरदिवसा जबरी चोरी, वृद्ध महिलेला जबर मारहाण

राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील मानोरी शिवारात भरदिवसा जबरी चोरी झाल्याने खळबळजनक घटना घडली आहे. चोरानी वृद्ध महिलेला गंभीर मारहाण केली असुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेल्या स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गणपतवाडी परीसरात लक्ष्मण रामचंद्र खामकर यांचा बंगला आहे. त्यांची पत्नी मुलगी अन् ते आज पारनेर तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई एकटीच असल्याचा फायदा घेत मोटर सायकलवरून आलेल्या अज्ञात दोन भामट्यांनी परीसरात प्रवेश केला. बंगल्याची बेल वाजवून थेट घरात प्रवेश करत वृद्ध सरूबाई खामकर यांच्या तोंडात बोळा कोंबत गंभीर मारहाण केली. सदर मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्या भामट्यांनी तेथून धूम ठोकली. स्थानिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमीची प्रकृत्ती गंभीर असल्याचे समजते.

सदर घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे, स.फौ.म्हातरबा जाधव, प्रमोद ढाकणे आदि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ, फाॅरस्निक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button