गुन्हे वार्ता

राहुरी पोलीसांकडून विद्युत मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील शेतकरी बंधूंच्या विहीरींवरील विद्युत मोटार चोरी करणाऱ्या टोळीतील चोरांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना मोठे यश आले आहे.

राहुरी पोलीस ठाणे गुरनं. १३६/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहितीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विश्लेषण करुन नमुद गुन्हातील मुख्य आरोपी नामे संतोय सुरेश गोलवड, वय १९ रा. सडे ता राहुरी, नवनाथ बाबासाहेब पवार, वय २४ रा.सडे महादेव वाडी, सार्थक आण्णासाहेब वांडेकर, वय १९ रा. पागीरे वस्ती वांबोरी, अभिजीत भागवत कोळसे, वय ३२ रा. आंबी ता राहुरी, मयुर भास्कर उंडे वय ३० रा. देवळाली प्रवरा ता राहुरी, यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपींकडे अधिक विचारपुस व चौकशी करीता त्यांनी ९ मोटारी मौजे. सडे, महादेव वाडी, उंबरे व कॅनाल परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. नमुद गुन्ह्यातील चोरी करणारे व चोरीच्या मोटारी घेवून जे स्वतः शेतकरी असताना त्या मोटर स्वतः च्या असल्याचे भासवून सदर मोटर अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, श्रीरामपुर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व सफौ एकनाथ आव्हाड, पोहेको विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना प्रविण बागुल, पोना प्रविण अहिरे, पोकों प्रमोद ढाकणे, पोकों नदीम शेख, पोकों शिरसाठ, पोकॉ सचिन ताजणे, पोका गणेश लिपणे, पोको सम्राट गायकवाड, पोकों अमोल गायकवाड, मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना सचिन धनाड, पोना संतोष दरेकर, पोहकों अशोक शिदे, पोकों अजिनाथ पाखरे, पोकों रोहकले, चापोहेका शकुर सय्यद यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, लेखनिक पोकों सतोष राठोड हे करत आहेत.

राहुरी तालुक्यातील शेतकरी बंधूंनी अनावधानाने जुनी विद्युत मोटार कुणाकडून विना पावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच सर्व शेतकरी बंधुंनी जुन्या मोटार विकत घेताना सदर मोटार चोरीची नसल्याबाबत मोटारचे ओरिजनल बिल प्राप्त करून बिलावर नमूद दुकानदार यांचेशी संपर्क साधून सदर मोटार चोरीची नसल्याबाबत खात्री करावी व कमी पैशात मिळणाऱ्या मोटारपंपाच्या प्रलोभनांना बळी पडु नये. तसेच मोटार चोरीबाबत कुणाला काही माहीती द्यावयाची असल्यास पो.नि. संजय ठेंगे नं. 8788891147, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण नं.९९२३४१७३४९, पोकॉ. राठोड नं. ९७०२९१९६९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पो. नि. संजय ठेंगे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button