धार्मिक

शिरसगाव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त महाआरती व मिरवणूक उत्साहात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अयोध्यात होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर श्रीराममय वातावरण आज होत असल्याने शिरसगाव येथेही सकाळी १० वा. श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.

दुपारी १२ वा. सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, निलेश यादव, गणेश मुदगुले, गणेश वाघ या दांपंत्याचे हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या आनंदमय सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा सोहळा यशस्वीतेसाठी श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गणेशराव मुदगुले, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, अशोकराव पवार, बापूसाहेब काळे, सुरेश मूदगुले आदी मान्यवरांसह सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामस्थ व भजनी मंडळाने परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button