अहमदनगर

लोणी खुर्द सेवा संस्थेच्या सभासदांना दिवाळी निमित्त १० टक्के लाभांश

संस्थेचे चेअरमन राजेंद्र आहेर यांची माहिती

लोणी : लोणी खुर्द सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली असून सभासदांना दिवाळी निमित्त १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र आहेर यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले लोणी खुर्द सेवा संस्थेची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी सन १९४६ ला भुमिपुत्र माजी आमदार चंद्रभान घोगरे यांनी केली असुन ते संस्थेचे संस्थापक आहे. संस्थेला दैदीप्यमान इतिहास आहे. संस्थेचा कारभार, संस्थेचे संचालक तथा लोणी खुर्द गावाचे सरपंच जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक मंडळ सभासदांचे हित जोपासत असुन संस्थेचे जवळपास १८०० सभासद आहे. संस्थेकडे सभासदांचे शेअर्स रक्कम १ कोटी रुपये असुन संस्थेचा अ.नगर जिल्हा सहकारी बँकेत सुमारे २६ लाख रुपये शेअर्स असुन नाॅन रिफेंडल फंड ६० लाख रुपये आहे. संस्थेची बॅंकेकडे ठेव रक्कम १२ लाख रुपये आहे.

संस्थेचे कर्ज वाटप जवळपास ६.२५ कोटी रुपये असुन दरवर्षी संस्था जिल्हा बँक पातळीवर कायमचं १००% वसुलीस पात्र असते. तसेच संस्था पातळीवर जवळपास ९५% वसुल असलेली राहाता तालुक्यातील ही अग्रक्रम असलेली सेवा संस्था आहे. सभासद कायमचं नित्य नियमाने आपल्याकडे असलेले कर्ज ३१ मार्च, ३० जुन रोजी संस्थेला कर्जाचा वसुल देणारे सभासद असल्याने राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारे पंजाबराव देशमुख व्याजाचा तालुक्यात सर्वाधिक परतावा रक्कम सभासदांना प्राप्त करणारी संस्था आहे.

दिवाळीच्या निम्मिताने सभासदांना १०% डिव्हिडंड वाटप करण्याचा निर्णय घेतल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त होत असुन संस्थेचे बैठकीसाठी संचालक तथा लोणी खुर्द सरपंच जनार्दन घोगरे, व्हा.चेअरमन बाबासाहेब मापारी, संचालक आण्णासाहेब तुपे, शंकर राऊत, महेश आहेर, विनायक घोगरे, कैलास आहेर, मंगेश घोगरे, भास्कर आहेर, मिराबाई घोगरे, शांताबाई आहेर, सचिव सोमनाथ पवार, उपसचिव चंद्रशेखर कोते आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button