पश्चिम महाराष्ट्र

भूमी फाउंडेशनचे कार्य गौरवास्पद- पोलीस आयुक्त रितेश कुमार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या प्रेरणेतून तरुण समाजसेवक कैलास पवार यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित स्थापित झालेल्या भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे कार्य शैक्षणिक, सामाजिक ग्रामीण भाग तसेच विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुलं, असंघटित कामगारांचे मुलं, आपत्तीच्या काळात राज्यभर विविध ठिकाणी मदत अशा विविध स्वरूपाची समाजोपयोगी विधायक कार्य संस्था अविरतपणे सातत्याने करीत आहे. हे निश्चित गौरवास्पद असून अभिनंदन आहे असे उद्गार पुणे जिल्हा येथे नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यक्त केले.

भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे राज्यव्यापी सुरू असलेले सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली तसेच यावेळी संस्थेचा वार्षिक कार्य विशेष 2023 यशोगाथा हा अंक पोलीस आयुक्त कुमार यांना भेट देण्यात आला. याप्रसंगी अनेक विविध सामाजिक प्रश्नावरती सविस्तर पणे चर्चा झाली. पोलीस आयुक्त कुमार यांनी भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा व्यक्त केल्या.

एक उत्कृष्ट प्रशासक अधिकारी कायदा व सुव्यवस्थेची पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडणारे, तात्काळ निर्णय क्षमता, कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी अशी उत्कृष्ट काम करण्याची पद्धत मा.कुमार साहेब यांची दिसून आली, असे मत प्रसार माध्यमांशी बोलताना संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचा नव्याने पदभार स्वीकारल्या बाबत संस्थेचे मार्गदर्शक मा.प्राचार्य शेळके, प्रा.डॉ.बी.एस. मुरादे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, सेवानिवृत्त एअर फोर्स ऑफिसर अमित कुमार दुबे, पुणे जिल्हा सत्र न्यायालय ॲड. प्रकाश दोंदे, संपादक करण नवले, संपादक प्रकाश कुलथे, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, डॉ.अनिल कुमार शहाणे, अहमदनगर जिल्हा समन्वयक भीमराज बागुल आदींनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button