अहमदनगर

हरेगाव येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. सकाळी ८.३० वा. हरेगाव दोनवाडी येथे ध्वजारोहण झाले. हरेगाव ग्रामपंचायत प्रशासक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वा. नवीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या हस्ते पोस्ट ऑफिस समोरील स्मारक या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्र.पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी प्रतिपादन केले की, डॉ. आंबेडकर यांचे काम हे घटनेच्या माध्यमातून समाजासाठी न्याय देण्याचे आहे. त्यामुळे भारताच्या सर्व नागरिकांना आपले मुलभूत हक्क मिळाले आहेत. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हरेगाव बुद्ध विहार या ठिकाणी सुद्धा महिला मंडळाच्या हस्ते व खजिनदार बाबुराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी ६ वा. भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यात हरेगाव जयंती उत्सव पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारे जयंती उत्सव साजरा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सुनील शिणगारे यांनी दिली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button