अहमदनगर

तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बैलगाडा शर्यतीसह रंगणार भव्य निकाली कुस्त्याचे मैदान

राहुरी | रमेश खेमनर : तालुक्यातील तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि.१६ एप्रील रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कावड मिरवणूक भव्य आकर्षण सुप्रसिद्ध डॉन नंबर वन डीजेच्या माध्यमातून मिरवणूक होणार आहे.

मुळामाई देवी मंदिर येथे प्रथेप्रमाणे सवासणी कार्यक्रम सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील व सायंकाळी ७ वाजता छबिना मिरवणूक होईल व त्याच दिवशी मंगळवारी दुपारी ४ ते ८ या वेळेत भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत पैलवानांची हजेरी लागणार आहे. त्यानिमित्ताने मुळामाई यात्रा उत्सव कमिटी तमनर आखाडा यांच्या वतीने कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे.

मुळामाई केसरी २०२४ साठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्विराज पाटील विरुद्ध उप महाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांची नंबर एक ची कुस्ती घेण्यात येणार आहे. त्यासाठी रक्कम रुपये दोन लाख व मुळामाई केसरी मानाची चांदीची गदा ठेवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त ३४ इतर नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या पोस्टरवर नेमण्यात आल्या आहे. या कुस्त्यांच्या लढतीसाठी निवेदक म्हणून माढा तालुक्यातील गार अकोले येथील युवराज केचे हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच बुधवार दि.१७ एप्रील रोजी दु. २ वाजल्यापासून भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून सदर दोन्ही मैदानास कुस्ती व बैलगाडा शर्यत शौकीनांनी या खेळांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुळामाई देवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button