साहित्य व संस्कृती

डॉ.उपाध्ये लिखित ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ संसारी व साधकांना दिशादर्शक ठरणारा ग्रंथ- ह.भ.प. श्रावण महाराज जाधव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आजचे शिक्षण आणि कालचे शिक्षण यामध्ये मोठे अंतर आहे. ज्ञानशील संस्कार आणि श्रमशील नम्रता देते तेच खरे शिक्षण असून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेऊन लेखक झाले, त्यांनी लिहिलेला ‘भारतीय कुंभार समाजातील संत ‘हा ग्रंथ संसारी व साधकांना दिशादर्शक ठरणारा असल्याचे मत सरला बेटाचे ह.भ.प. श्रावण महाराज जाधव यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर जवळील गोंधवणी येथे कै. नंदकुमार बोर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानंतर बाबुराव बोर्डे यांच्या निवासस्थानी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थितींना विविध पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी ह.भ.प. योगेश महाराज गायकवाड, ह.भ.प. सुनील महाराज वाकचौरे, चिंचवड येथील दिलासा साहित्य ग्रुपचे अशोकराव गोरे, अनिल वाकचौरे, बाबुराव बोर्डेसह परिवार उपस्थित होते.

डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ हा भारतीय कुंभार समाजातील संतांचा थोडक्यात आढावा घेणारा दुर्मिळ ग्रंथ असून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रकल्प योजनेतील हे संशोधन आहे, अनुदान आयोगाच्या पत्रानुसार हा ग्रंथ प्रकाशित केला आहे, त्यासाठी कुंभश्री, कुंभकार भारत, कुंभकार दर्शन, तसेच कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, लातूरचे ‘विचारशलाका’ संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, लिज्जत पापडचे सुरेश कोते, जामखेडचे विठ्ठलराव राऊत, बेलापूर बदगीचे संजय उकिरडे आदींचे खूप सहकार्य झाले.

अशोकराव गोरे यांनी या लेखनाचे कौतुक केले. श्रावण महाराज जाधव यांनी अशी पुस्तके आम्हाला कीर्तन, प्रवचन, चर्चेसाठी उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. उपाध्ये यांच्या साहित्य निर्मितीचे त्यांनी कौतुक केले. तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button