अहमदनगर

डॉ. शीतल सुसरे यांनी मिळविलेली डॉक्टरेट पदवी ग्रामीण स्त्रीपुढे आदर्श-ह.भ.प. रामायणाचार्य नाना महाराज कदम

राहुरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे डॉ. सौ. शीतल सुसरे / गागरे यांनी मिळविलेली मराठी विषयातील उच्च अशी डॉक्टरेट पदवी आजच्या ग्रामीण गृहिणी, स्त्रीपुढे आदर्श असल्याचे मत नेकनूर येथील संत सद्गुरू बंकटस्वामी संस्थानचे ह. भ. प. रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी व्यक्त केले.

श्रीरामनवमी निमित्त तांभेरे येथे कीर्तनसेवा कार्यक्रमात ग्रामस्थांनी डॉ. शीतल सुसरे /गागरे व राजेंद्र पंढरीनाथ गागरे यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. शीतल सुसरे यांनी संशोधन व पदवी माहिती दिली, आपला सत्कार महाराज व ग्रामस्थांनी केला, त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

बेलापूर कॉलेजमधील प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, प्रा. तुकाराम पाटील यांचे विशेष मार्गदर्शन, सहकार्य मिळाले, माहेरचे सुसरे व सासरचे गागरे परिवार यांचे मनापासून सहकार्य झाल्यामुळेच मी एवढी मोठी पदवी मिळवू शकले असे डॉ. शीतल सुसरे यांनी सांगून तांभेरे ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी तांभेरे रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे, सचिव चंद्रकांत पवार, गोकुळदास मुसमाडे, विलासराव मुसमाडे, सुनील गागरे आणि भक्तगणांसह ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र गागरे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button