साहित्य व संस्कृती

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च आनंद – साहित्यिक मोरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मी तेर गावी संत गोरोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो, माझ्या ‘पताका’ पुस्तकास श्रीरामपुरातील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनातील प्रेरणादायी असा सर्वोच्च आनंद आहे, असे मत छत्रपती संभाजीनगर येथील संत साहित्याचे अभ्यासक सोमनाथ मोरे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय श्रीसंत साहित्य पुरस्कार आणि वाचन, लेखन प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थी म्हणून सोमनाथ मोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे तर अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. मान्यवर पाहुणे व सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. छायाताई सोनवणे, सौ. आरती उपाध्ये, संगीता फासाटे आदिंनी श्रीसंत गोरा कुंभार प्रतिमेचे पूजन केले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून देऊन सत्कार केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

छ.संभाजीनगरचे सोमनाथ मोरे, संगमनेरचे प्रा. दिलीप सोनवणे, अकोलेचे पुंडलिक गवंडी कुमावत, श्रीरामपूरचे प्राचार्य शंकरराव अनारसे, सुखदेव सुकळे, भागवतराव मुठे, ह.भ.प. सोपानराव वेताळ महाराज, लेविन भोसले या सर्वांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुस्तके, गुलाबपुष्पे देऊन प्राचार्य शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ.शिवाजी काळे यांनी सत्कार केले. यावेळी सर्व पुरस्काराथींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे, आरती उपाध्ये यांनी पुरस्कार वितरणाचे निवेदन केले.

यावेळी पुरस्कार समिती अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे, प्रा. विलासराव तुळे, बोरावके महाविद्यालयातील प्रा. सुजित भास्कर जगदाळे, खोकरचे दिव्यांग समिती सदस्य गंगाराम सोमवंशी, शिरसगावच्या प्राचार्या सुमतीताई औताडे, रोहिणी गुंड, सूत्रसंचालक संगीता फासाटे, पत्रकार बाबासाहेब चेडे, किशोर गाढे गुरूजी, गणेश गवंडी, फकिरा वाघमारे, सुभाष मोरे, बाबासाहेब यादव आदिंचा सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे गणेशानंद उपाध्ये, नीतीन जोर्वेकर, प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे, माधुरी जोर्वेकर, कुंदा तुळे, सुनंदा वाघमारे, स्मिता मोरे आदिंनी नियोजन केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी वाचनामुळे आणि पुरस्कारामुळे जीवन धन्य होते तर अध्यक्ष प्राचार्य शेळके यांनी संतांचे विचार, आचार आणि कार्य यांचा आदर्श जपला पाहिजे असे आवाहन केले.

या प्रसंगी आरोग्यमित्र भीमराज बागूल, श्रीमती सुमनबाई मांढरे, चेतन तुळे, श्रद्धा तुळे, मनिषा गुंड, स्मिता माळी, वैष्णवी जगदाळे, कल्पना जगदाळे, रूपाली मोरे, राधिका डेंगळे, गीतांजली गाढे, प्रमिला वाबळे, रोहिणी पटारे, सविता जपे, सुनंदा कार्ले, शालिनी निघुते, वैशाली गाढे, स्मिता बारसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता फासाटे, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button