साहित्य व संस्कृती

डॉ. जगताप संत गुरु रविदास महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : चर्मकार विकास संघाच्या वतीने आयोजित केलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती उत्सव सोहळ्यात संमोहन तज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांतर्फे गौरविण्यात आले.

यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार लहू कानडे, भाजपचे प्रकाश चित्ते, माजी पोलीस अधिकारी साहित्यिक सुभाष सोनवणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, भाऊसाहेब डोळस, संतोष देवराय आदिंच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. हा सोहळा श्रीरामपूर येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

डॉ. रामकृष्ण जगताप यांनी पुणे विद्यापीठ पुणे येथून डॉ.बाबुराव उपाध्ये व डॉ. वसंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संमोहन विषयावर पीएच.डी.पदवी संपादन केली. असा अभ्यास अजून कोणत्याही विद्यापीठात झालेला नाही. डॉ. जगताप यांनी ‘संमोहन काळाची गरज’, ‘तथास्तु’, लेखणीचे झाड’, ‘पोरका बाबू’, ‘ साहित्यशिल्प’ ‘अंतर्मन बोले तथास्तू’ लहान मुलांना लिहिते करून त्यांनी अशा छोट्या कविंच्या चिमुकल्यांच्या कविता, कुक्कडवेढ्याच्या कविता’ अशी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.

डॉ. जगताप सध्या उंबरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मानसशास्त्र व संमोहनच्या माध्यमातून त्यांनी अनेक मनोरुग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी राज माइंड पावर पब्लिकेशनच्या माध्यमातून ना नफा ना तोटा जाणिवेने अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button