धार्मिक

अतःकरणात तळमळ असली की भगवंताचे दर्शन घडते – महंत रामगिरी महाराज

श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदिरगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव सांगता कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी अंत: करणात तळमळ असली की भगवंताचे दर्शन घडते असे प्रतिपादन केले. गेल्या ३० एप्रिल पासून ते ७ मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांनी किर्तन सेवा दिली. शेवटच्या दिवशी सायंकाळी ६ वा. महंत रामगिरी महाराज यांची रथातुन सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

सप्ताह काळात ज्या भाविकांनी सकाळी चहा, नाष्टा, सायंकाळ चे अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मानीत केले. तसेच संत पुजन केलेल्या भाविकांना महाराजांच्या हस्ते ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांची प्रतिमा, श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच गावातील तरुण युवकांचे महाराजांनी कौतुक केले. शेवटी महाराजांनी दहिहंडी फोडुन काल्याच्या किर्तनाने सांगता केली. उंदिरगांव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button