शिक्षणवारी ज्ञान पंढरी

प्रा. जाधव यांची सामाजिक शास्त्र समन्वयकपदी निवड

राहुरी | जावेद शेख : येथील राहुरी एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे तज्ञ प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (SCERT) अंतर्गत इयत्ता बारावीच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या प्रमुख समन्वयकपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत सामाजिक शास्त्र विभागप्रमुख सचिन चव्हाण यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा केली. ही निवड इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र विषयातील विषयनिहाय आवश्यक साहित्य निर्मिती करणे, बहुविध प्रश्नपेढी व प्रश्नपत्रिका निर्माण करून पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. प्रभावतीताई सतीश बिहाणी, सचिव मनोजशेठ बिहाणी, सहसचिव अनुपशेठ बिहाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास अनाप तसेच शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा.मनोजकुमार जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button