अहमदनगर

इपीएस पेन्शन धारकांचा नगर येथे निषेध मोर्चा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जिल्ह्यातील पेन्शन धारकांचा 31 मार्चला निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ईपीएस भवन, दिल्ली येथे नियोजित आंदोलन सुरू करण्याच्या अगोदरच आपल्या नेत्यांना पकडून गाडीमध्ये टाकून पोलिस स्टेशनमध्ये नेले. आंदोलन सुरु करण्याच्या अगोदरच धरपकड केली व क्रुरपणे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. याचा सर्व थरातून निषेध होत आहे.

केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिस यांचा निषेध करण्यासाठी अहमदनगर येथे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वा. तारकपूर बस स्टॅण्डवर जमून तेथून निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. आपल्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आपल्या नेत्यांना पोलिस अटक करतात ही अतिशय शरमेची बाब आहे. आम्ही घरी बसून हा अन्याय कसा सहन करणार ? यासाठी हजारोंच्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच दि. 2 एप्रिल पासून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत अनिश्चित काळासाठी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या अहमदनगर व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी येथील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, उपाध्यक्ष एस के सय्यद, अहमदनगर शहराध्यक्ष संजयजी मुनोत, उपाध्यक्ष प्रकाश गायखे, तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, सुकदेव पाटील आहेर, ज्ञानदेव डौले, हौसराज राजळे, भगवंतअप्पा वाळके, अशोकराव देशमुख, पी.जी.गोडसे, आयुबभाई शेख, राधाकृष्ण धुमाळ, कवि अडसुरे, दशरथ पवार, साहेबराव वाघ आदी पदाधिकार्यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button