अहमदनगर

पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा खर्च करुनही म्हैसगाव ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचा घरोघर पुरवठा करण्यासाठी शासकीय योजनेद्वारे मोठा निधी खर्च करुन देखील म्हैसगाव परिसरातील ग्रामस्थांना या पाइपलाइन द्वारे पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

काही दिवसांपूर्वी म्हैसगाव ग्रामपंचायतीने‌ गावातील घरोघरी पाणी पुरवठा करण्यासाठी दलित वस्ती व इतर वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी खर्च करुन २ कि.मी. अंतराची पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन बनविली होती. पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन म्हैसगाव ते केदारेश्वर वस्ती रस्त्याच्या कडेने नेण्यात आली. सर्व वस्त्यांना पाणी पुरवठा करण्याची तयारी झाली.

ही पाइपलाइन झाल्यावर दलित वस्ती व इतर वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येईल, असे वाटले. परंतु आजही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी तरी पाण्याने भरण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button