गुन्हे वार्ता

मुरम्यात भावकीतील तरुणांकडून दारू पेवून एकावर कोयत्याने वार

विजय चिडे/पाचोड : क्षुल्लक कारणामुळे भावकीतील एका एकोणतीस वर्षीय व्यक्तीवर एका दारुड्याने कोयत्याने वार करुन कान तोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण तालुक्यातील मुरमा येथे मंगळवारी (दि.१०) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.

अधिक माहिती अशी की, मुरमा येथिल अमोल जगन्नाथ चिडे (वय२५ वर्षे) ता.पैठण हा मंगळवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान गावात दारू पेऊन रस्तावर घाणेरड्या शिवीगाळ करु लागला असल्याने कैलास चिडे यांनी त्यास समजून सांगितले की, सध्या दिवाळीचा सण सुरू आहे सर्वाच्या घरी पाहूणे आहे. त्यामुळं तु इंथे रस्त्यावर शिव्या देऊ नको असे म्हणताच अमोल चिडे याने कंबरेचा धारदार कोयता काढून कैलास चिडे यांच्या डोक्यावर वार केला असता कोयता हा त्यांच्या कानावर लागल्यामुळे कानांचे दोन तुकडे झाले आहे. यावेळी कैलास चिडे च्या कानावर कोयता लागल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावातील काही नागरिकांनी घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्यात कळविली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी जमादार किशोर शिंदे, कर्मचारी संदीप पाटेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने कैलास यास तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हालविले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम,३२३, ३२६, ५०६, ५०४ या नुसार अमोल चिडे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी करीत आहेत.

अमोल चिडे हा गुंडप्रवृत्तीचा असून त्यावर मागील तीन-चार वर्षात डिझेल, पेट्रोल, घरगुती साहित्य, शेती औजार, शेतातील कापूस चोरी करणे तसेच दारू पेवून रस्त्यावर भांडण करणे, विनाकारण दररोज गावात धारदार कोयता घेऊन फिरून आपली दहशत निर्माण करणे. असे प्रकार घडत आहे. तसेच यापूर्वी त्यांच्या वेगवेगळ्या गुन्हात त्याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे गावात तो सतत दहशत निर्माण करत असल्याने त्याचा चांगला बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button