औरंगाबाद

ये दोस्ती हम नही छोडेंगे, २६ वर्षानंतर वर्गमित्र एकत्र

१९९६ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेतील १९९६ साली दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत बालानगर येथे स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये १९९६ च्या बॅचच्या १०२ मुलांपैकी ८० मुलं उपस्थित होते. त्याचबरोबर बॅचला शिकवणारे शिक्षक श्री.अडसरे, श्री. दौंड,  श्री. दानशूर हे देखील उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दौंड यांनी १९९६ ची बॅच खूप हुशार होती आणि त्यातली बहुतांश मुलं चांगल्या हुद्द्यावर लागून प्रगत शेतकरी झालेले आहेत. खर्‍या अर्थाने याचा मला अभिमान आहे असे मनोगत व्यक्त केले. तर श्री. अडसरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की मित्रांनो तुमच्या आयुष्याला काना, मात्रा, उकार देण्याचे काम आम्ही केलं आणि तुम्ही खर्‍या अर्थाने जीवन जगत आहात. तर श्री. दानशूर यांनी सांगितले की आयुष्याचं गणित तुमचं कोणाचं चुकलं नाही, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात आणि आयुष्यात सक्सेस झाला. याचा मला अभिमान आहे. कोणी प्रगत शेतकरी झाला तर कोणी जनसेवा करतात ती एका अर्थाने आजच्या पिढीला एक शिकवणच आहे. 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पोपळघट, राजू शेषराव यांनी केले तर प्रास्ताविक अलीम शेख यांनी केले. त्यानंतर १९९६ च्या बॅचमधील एम.डी. डॉ. प्रशांत बांदल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यामध्ये विद्यार्थी दशेत असलेला खोडकरपणा हा आवर्जून त्यांनी सर्वांसमोर मांडला. तसेच प्राथमिक शिक्षक रामनाथ मोहिते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या  स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक खऱ्या अर्थानं बालानगर येथील वर्गमित्र अच्युत गोर्डे, हनुमान रुळे, गणेश ससाने, अफसर शेख, बाळु गोर्डे,  जाबीर पठाण, अकतर भैय्या,  मच्छिंद्र गोर्डे, ज्ञानेश्वर गोर्डे, मीनाज सय्यद, कैलास गोर्डे यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी महेश सोनवणे यांनी आपल्या शेतात छानशी निसर्गरम्य जागा उपलब्ध करून दिली. सर्व मित्र सवंगडी यांनी स्नेह भोजन घेऊन मोठ्या आनंदामध्ये एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन भावनिक होऊन परत पुढच्या वर्षी भेटण्याचा निर्धार करून एकमेकांचा निरोप घेतला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button