औरंगाबाद

मुरमा परिसरात विजेचा लपंडाव…

पाऊस राहतो मिलीभर विज जाते रात्रभर; महावितरणचे दुर्लक्ष

विजय चिडे/पाचोड : पावसाने हजेरी लावताच पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीबोडखा शिवारात वीजपुरवठा खंडित होत असुन अनेक तासन् तास वीज गायब होत असल्याने नागरिकांसह पोलिस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पाचोडसह परिसरातील मुरमा, कोळीबोडखा, थेरगाव, लिमगाव आदी भागातील शेकडो मुले सध्या पोलिस भरतीची पुर्वतयारी करत आहेत. ऐन परीक्षाच्या तोंडावर दिवसभर अन् रात्र भरही विज गायब राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी मोठी कसरत घ्यावी लागत आहे. बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावताच विज गायब झाली. रात्रीचे आठ वाजले तरी विज आली नव्हती. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विजेच्या लंपडावामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या परिसरात विजेचा पुरवठा कमी दाबाने येत असल्याने घरात लाईट असून नसल्यासारखी वाटते. सतत फ्यूज जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. साधे फ्यूज गेल्यावर नागरिकांना तासंतास वीज येण्याची वाट बघावी लागते. पाचोड येथील वीज कार्यालयात वरिष्ठांचा कर्मचाऱ्यावर अंकूश नसल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे.

ट्रान्सफार्मरमध्ये राञीच्यावेळी शुल्लक अडचण निर्माण होऊन लाईट गेली तर सकाळपर्यंत वाट बघावी लागते. तोपर्यंत नागरिकांना राञ अंधारात घालावी लागते. विजेच्या बाबतीत विचारले की, लाईट वरून गेलेली आहे. असे सांगून नागरीकांची दिशाभूल करून वेळ मारून नेली जाते. यासंदर्भात विद्युत महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष वेधून अडचण सोडवून नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button