अहमदनगर

कॅन्सर ग्रस्तास उपचारासाठी बचत‌ गटाची आर्थिक मदत

श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथील नाना ढवळे हे गरीब कुटुंबातील असून त्यांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आहे. ढवळे हे कुटुंबातील प्रमुख आहेत, वडील वयोवृद्ध असुन कुटुंब चालवणे व उपचारासाठी पैसे गोळा करणं कोराना सारख्या माहामारीमुळे अवघड झाले आहे.


हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. हिरडगाव येथील नाना ढवळे यांच्यावर असाच प्रसंग ओढवला. उपचारासाठी आर्थिक तरतूद नसल्याने चिंता वाढली. मात्र अशा आपत्तीत त्यांच्या मदतीला संजीवनी बचत गट धावुन आले आहे. तातडीने उपचार व्हावे यासाठी संजीवनी बचत गटाने रोख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांची मदत त्यांना देऊन मदतीचा हात दिला आहे.

आयुष्यात ओढवलेल्या संकटाच्या वेळेत मदत केलेल्या संजीवनी बचत गटाच्या सदस्यांचा मनाचा मोठेपणा नक्कीच कौतुकाचा आहे. ढवळे यांना कर्करोग झाल्याने टाटा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आता येणारा खर्च आवाक्याबाहेर असल्याने कुटुंबाची उपजीविका असल्याने गरीब असलेल्या ढवळेंवर संकट ओढवले आहे. ढवळे यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असल्याचे कळताच संजीवनी बचत गटाने ताबडतोब त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी ढवळे व त्यांचे कुटुंबीय तसेच हिरडगाव येथील ग्रामस्थांनी संजीवनी बचत गटाचे आभार मानले. यावेळी संजीवनी बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button