राजकीय

गुरुमाऊलीने सभासदांना ठेवले अंधारात – संजय वाघ

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत जवळपास दहा हजार पाचशे सभासद असून सत्ताधाऱ्यांनी प्रत्येकी 7000 रुपये सभासद कर्ज निवारण व मदतनिधी नावाने कपात केली असून सदर रक्कम सभासदास डिसेंबर होते वेळेस देणार असे सांगितले होते. परंतु गुरुमाऊली मंडळाने  ठराविक लोकांनाच या सात हजार रुपये कपातीच्या पावत्या दिलेल्या आहे व बाकी सभासदांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रकमेची कपात मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केली असून त्याच वेळी ती मयत सभासदांना दिली गेली पाहिजे होती.
परंतु अजूनही काही मयत सभासदांना त्याचा लाभ झालेला दिसत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. यावर गुरुकुल मंडळ आवाज उठवून या पावत्या सर्व सभासदास वितरित करण्याची मागणी गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष संजय वाघ यांनी केली आहे. सभासद अगोदरच या दोन्ही मंडळाच्या कारभाराला त्रस्त असून पावत्या सर्वांना न मिळणे ही संताप जनक गोष्ट आहे असे मत स्वराज्य मंडळाचे नेते निलेश राजवळ यांनी व्यक्त केले आहे.
या पावत्या सर्व सभासदांना मिळाव्यात व सर्व सभासदांना न्याय मिळावा यासाठी गुरुकुल व स्वराज्य मंडळ पाठपुरावा करेल असे बैठकीत ठरले आहे. या बैठकीसाठी अनिल ओहळ, संजय वाघ, रवि वाघ, प्रल्हाद साळुंखे, सुनील बागुल, तौसिफ सय्यद, जठार भाऊ, राजू घोगरे, पांडुरंग पटारे, उस्मान तांबोळी, सोमनाथ शेंडे, योगेश राणे, इमाम सय्यद, हुसेन शेख, गणेश महाडिक, आबाजी भांगरे, चंद्रकांत पंडित, निलेश राजवळ, कल्पना बाविस्कर, रुबीना खान, गायकवाड, नीलिमा भोज आदि उपस्थित होते.
एका संचालकाच्या शाळेत सभासदांचे भेटीसाठी गेलो असता तेथील काही सभासदांना आपले सात हजार रुपये बँकेने कपात केली आहेत व त्याची पावती मिळते हे माहीत नव्हते. आपण आपल्या पावतीसाठी आग्रही रहा असे गुरुकुल स्वराज्य युतीचे उमेदवार कल्पना बाविस्कर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button