राजकीय

आगामी शिर्डी लोकसभेचा खासदार कोण? अशोकराव आल्हाट यांच्या एन्ट्रीने शिर्डी मतदार संघाची समीकरणे बिघडणार!

राहुरी | अक्षय करपे : लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागून निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. चला तर मग आपण पुढील काळात शिर्डी लोकसभेचा पुढील खासदार कोण होणार याकडे एक प्रकाशझोत टाकूया. शिर्डी मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेची फाळणी झाल्याने शिंदे ठाकरे गट प्रथमच लोकसभेला सामोरे जाणार आहे. शिर्डी लोकसभा अहमदनगर जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघाला उत्तर अहमदनगर मतदारसंघ म्हणूनही ओळखलं जाते.

2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तसेच हा मतदारसंघ एस सी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने प्रथम लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे व रिपब्लिक ऑफ इंडिया पक्षाचे रामदास आठवले यांच्यात लढत होऊन यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. त्यानंतर काही कारणास्तव भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदारकीची पहिली टर्म संपल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेकडून बबनराव घोलप यांचे नाव निवडणुकीसाठी आघाडीवर असताना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही आणि ऐनवेळी भाजपमधून कर्जत जामखेडचे आमदार असलेले सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करत अवघ्या 14 दिवसांत खासदार होण्याचा विक्रम आपल्या नावी केला.

त्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी भेटत त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र, आता शिर्डी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन राजकीय गणिते बिघडले असून शिवसेनेचे दोन भाग होऊन शिंदे ठाकरे गटामध्ये तिसराच उमेदवार निवडून येऊ शकतो असे चित्र आता या लोकसभेला दिसू शकते.

सदर 2024 – 29 लोकसभा निवडणुकीत संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाघचौरे, सदाशिव लोखंडे, रामदास आठवले, तसेच जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अशोकराव आल्हाट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यामुळे शिर्डी लोकसभेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. वरील उमेदवारांची पार्श्वभूमी बघितली तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी वारंवार पक्ष बदलामुळे शिर्डी लोकसभेच्या जनतेमध्ये संभ्रह आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांनी मतदारसंघांत कमी आणि मुंबई जास्त असा त्यांचा खासदारकीचा प्रवास राहिलेला असून त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याविषयी जनतेत प्रचंड प्रमाणात नाराजगी आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याबद्दल बोलायचे ठरले तर ही जागा महायुतीमधील शिंदे गटाला किंवा भाजपाला जाणार असल्याने रामदास आठवले यांची जास्त चर्चा मतदारसंघातील नागरिकांत होत नाही. मंग यामध्ये सक्षम पर्याय म्हणून जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवत असून सर्वसामान्य गोरगरीब वंचित दीनदलीत यांच्यासाठी ते लढत असतात. सर्व समाजांमध्ये सर्व पार्टीच्या नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत शिर्डी लोकसभेमध्ये तुल्यबळ उमेदवार म्हणून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावू शकतात. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्याने एन्ट्री केलेले जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट ओबीसी बहुजन पार्टी इतर छोटे-मोठे पक्ष सामाजिक संघटनांना सोबतीला घेऊन शिर्डी लोकसभेची बाजी पलटू शकतात अशी चर्चा शिर्डी लोकसभा मतदारसंघात होत असून पुढील काळात शिर्डी मतदार संघाचा पुढील खासदार कोण याची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button