आ. लंकेचे पी.ए. प्रा. आडागळे यांच्या उमेदवारीच्या चर्चेने मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का
अशोक मंडलिक | राहुरी : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके यांचे पी.ए.प्रा. रामदास आडागळे उमेदवारी करणार असल्याच्या चर्चेने प्रस्थापितांना धक्का बसला असून प्रा. आडागळे यांनी मात्र भेटीगाठीवर भर दिला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात तसेच वाड्यावर जाऊन आडागळे हे थेट संपर्क साधत असून या मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेत आहेत. प्रा. आडागळे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपले कुटुंब असल्यासारखे समजून अत्यंत आपुलकीने व जिव्हाळ्याने या भागातील प्रश्न समजावून घेऊन ज्येष्ठ, तरुण व महिला यांच्याशी अडीअडचणी बाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे अल्पकाळातच आपला माणूस म्हणून ते आपली ओळख करून देण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
निवडणुका आल्या तेव्हाच मतदार संघाशी संपर्क साधणार्यांना मात्र यांच्या या जनसंपर्क मोहिमेमुळे चांगलाच धक्का बसला असून प्रा. आडागळे यांनी उमेदवारी केल्यास आपले काय होणार अशी काळजी प्रस्थापितांना वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रा. आडागळे हे उच्चशिक्षित तरुण व सामाजिक प्रश्नांची जाण असणारे तसेच सेवाभावी वृत्ती अंगी कोरलेले निःस्पृह कार्यकर्ते शअसल्याने ते या भागात नवखे असले तरी जनतेला मात्र ते आपलेसे वाटत असल्याचे या भागातील काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे.