राजकीय

अशोकराव आल्हट यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा

राहुरी | अक्षय करपे : शिर्डी लोकसभेचा पुढील खासदार कोण याची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचत चालल्याने व इतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद, नाराजी नाट्यांमध्ये जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हट यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्या प्रचाराचा झंजावत सुरू केला असून गाव न् गाव ते पिंजून काढत असल्याने शिर्डी मतदारसंघातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत शिर्डी लोकसभेमध्ये त्यांच्या नेतृत्वाला मतदार प्राधान्य देणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

17 एप्रिल पासून शिर्डी लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रचाराचा शुभारंभ सुरू केला असून मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी, चर्चासत्र, मेळावे व बैठका संपन्न होत असून यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगत निर्माण झाली असून यामध्ये मात्र जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हट यांनी इतर उमेदवारांपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली असून नागरिकांचा कौल यावेळी नव्या नेतृत्वाला, नव्या चेहऱ्याला दिसून येत आहे.

दरम्यान शिर्डी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीने फायनल केलेले उमेदवार निष्ठावंत कार्यकर्त्यांना व मतदारांना पसंत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी निष्ठावंत नेत्यांनी बंडखोरी करणार असल्याचे दिसून येत असल्याने शिर्डी लोकसभा निवडणुकीत जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हट यांनी मात्र सर्व समाजाला, बहुजन वर्गाला व छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन शिर्डी लोकसभेच्या रणांगणात तळ ठोकल्याने शिर्डी लोकसभेत मोठ्या प्रमाणात रंगत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button