राजकीय
श्री पांडुरंग कृपा फळबाग सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी डॉ. काळे यांची तर व्हा. चेअरमनपदी सौ. सोनिरा पाटील यांची निवड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्री पांडुरंग कृपा फळबाग सहकारी संस्था मर्यादित शिरसगाव या संस्थेच्या चेअरमनपदी डॉ. रामलाल काळे यांची सर्व साधारण जागेसाठी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या नावाची सूचना शैलेश गजानन पाटील यांनी मांडली व दिनकर यादव यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदी सौ सोनिरा शैलेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या नावाची सूचना अभिषेक गवारे यांनी मांडली व अनुमोदन शशिकांत गवारे यांनी दिले तर सचिवपदी गोरक्षनाथ पवार यांची निवड झाली. निवडणुकीचे काम श्रीरामपूर सहकार अधिकारी श्रेणी २ सहाय्यक निबंधक आर.के. जाधव यांनी पाहिले. यावेळी संचालक अभिषेक गवारे, दिनकर यादव, गोरक्षनाथ पवार, शशिकांत गवारे, शैलेश पाटील, साईनाथ सोनवणे, पौर्णिमा काळे, सोनिरा पाटील, तसेच सोसायटी चेअरमन किशोर पाटील, ऋषिकेश औताडे, सुभाष यादव आदी उपस्थित होते.