अहमदनगर

प्रियंका काळाने- गाडेकर यांची मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी नियुक्ती

राहुरी | जावेद शेख : राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथील रहिवासी नंदकिशोर काळाने यांची कन्या प्रियंका काळाने – गाडेकर यांची एमपीएससी उत्तीर्ण होऊन मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल गुरूकल वसाहत येथील पावन गणपती प्रतिष्ठान व परिसरातील नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती मंदिरासमोरील प्रांगणात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल शिंदे यांनी केले तर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रियांका काळाने- गाडेकर यांनी पावन गणपती प्रतिष्ठान व गुरूकल वसाहत येथील नागरिकांनी सन्मान करून कौतुक केल्याबद्दल ऋण व्यक्त केले.

यावेळी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाल शिंदे, माजी उपनगराध्यक्ष व आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, सेवानिवृत्त शिक्षक अरुण कराड, सेवा निवृत्त तलाठी अरुण गायकवाड, उमेद फाउंडेशनचे कुणाल तनपुरे, विलास आल्हाडे, पंकज ढुमने, अभि राऊत, नंदकिशोर काळाने, प्रसाद काळाने, राहुल काळाने, तसेच गुरुकुल वसाहतीतील सर्व नागरिक व महिला उपस्थित होत्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button