अहमदनगर

पंचक्रोशी ओबीसी नियोजन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी

“राजलक्ष्मीं अग्रोटेक नर्सरी" यांच्या वतीने मध्यप्रदेश येथील आंबा रोपांचे वाटप

राहुरी : अठरा पगड जातींच्या एकत्र करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती सोनगाव पंचक्रोशीत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला तसेच क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, प्रवरा बँकेचे संचालक संतोष अंत्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब अंत्रे, मा उपसरपंच किरण पाटील अंत्रे, राहुरी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री जायभाय व श्री कोकाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंचक्रोशीतील बलराज पाटील, बिपिन ताठे, मोहम्मद तांबोळी, प्रशांत अंत्रे, संदीप अनाप, विनोद अंत्रे, राजन ब्राम्हणे, महेंद्र अनाप, संजय कानडे, दिलीप शिंदे, अभिजित ताजने, अन्सार तांबोळी, बाळासाहेब अंत्रे, राजेश अनाप, भिमराज अनाप, कैलास अनाप, महेश पर्वत, संपत अंत्रे, प्रवीण नेहे, सदू शिंदे, रमेश अंत्रे, भारत दिघे, अभिजित कुलकर्णी, गणेश अंत्रे, भाऊसाहेब शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास १८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली.

छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत आहे. या वर्षी महाराजांची ३९४ वी जयंती असल्या कारणाने सात्रळ येथील बलराज पाटील यांच्या “राजलक्ष्मी अग्रोटेक नर्सरी” यांच्या वतीने ३९४ आंबा रोपांचे वाटप पंचक्रोशीत करण्यात आले. विशेष म्हणजे मध्य प्रदेश येथील आदिवासी बांधवांकडून गोळा केलेल्या गावरान जंगली आंबा बीजांपासून ही रोपे केलेली आहेत. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपण वृक्ष लागवड, वृक्ष जपवणुक करण्यासाठी एक नवीन पाऊल उचलून वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

आंबा हा फळांचा राजा आहे. जंगली गावरान आंब्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारांचे अनुकरण नागरिकांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना किरण अंत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शामराव अंत्रे यांनी केले तर आभार नरेंद्र अनाप यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button