साहित्य व संस्कृती

‘शब्दगंध’ च्या वतीने रविवारी काव्य संमेलन व पुस्तकं प्रकाशन

राहुरी/ बाळकृष्ण भोसले – शब्दगंध साहित्यिक परिषदे च्या वतीने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच आयोजित करण्यात येणार असून त्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठीं रविवार दि. २४ जुलै  रोजी दु २ वा. वॉरियर्स एज्युकेशन सेंटर व प्री प्रायमरी स्कूल, यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज जवळ, कॉटेज कॉर्नर, सावेडी, अहमदनगर येथे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
दुपारी २ ते ५ या वेळात बैठकीनंतर अनाथांची माय या प्रातिनिधिक लेख – काव्यसंग्रहाचे व अनाथांची माय माऊली सावित्रीबाई फुले लेखक हिराचंद ब्राह्मणे या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असुन यावेळी नवोदित कवींचे काव्यसंमेलनही होणार आहे.
तरी सर्व सभासद, हितचिंतक व पदाधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत व प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button