सामाजिक

हरेगांव येथे स्टेट बँक आपल्या दारीचे आयोजन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अग्निपंख फाउंडेशन आणि सुमित फोटो यांच्या सौजन्याने उंदीरगाव व हरेगाव पंचक्रोशीतील नागरिकांसाठी गुरुवार, दि. 25 मे रोजी कपीले हलवाई शेजारी सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजे पर्यंत ‘स्टेट बँक आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात जनधन खाते नोंदणी सुविधा त्वरित बँक खाते काढून मिळेल. शालेय महाविद्यालय विद्यार्थी शिष्यवृत्ती खाते, फायदेशीर गॅस सबसिडी, बचत गट, रेशन कार्ड व सरकारी योजनेसाठी उपयुक्त गुगल पे, फोन पे, भीम ॲप साठी उपयुक्त, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, आधार कार्ड व एटीएम द्वारे पैसे काढून मिळतील. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दोन फोटो आणावेत.

तसेच पॅन कार्ड देखील काढून दिले जाईल, नाव बदलणे व नाव दुरुस्ती करणे यांची कामे केली जातील. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे अग्निपंख संस्थेने आवाहन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button