शिरपूर येथे मेकअप संदर्भात सेमिनार संपन्न
सोलापूर : शिरपूर ता.माळशिरस जि.सोलापूर येथे स्वंयम सिद्धम संस्था, नागपूर व अनुजा मेकअप स्टुडिओ, कळंब यांच्या विद्यमाने मेकअप संदर्भात सेमिनार आयोजित करण्यात आला होता.
कळंब शहरातील अनुजा सोनटक्के या प्रथम ब्युटीशियन आहेत की, त्यांना सेमिनार मेकअप स्टेज करण्याची संधी मिळाली. तरी हे स्टेज स्वयंम सिद्धम संस्थेने भोपाळ येथे २५० प्रवेशार्थी मधून बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून निवड केल्यामुळे सदर स्टेज सेमिनार देण्यात आले होते. अनुजा सोनटक्के यांच्या कठोर परिश्रमामुळे शेख शेट्टीयांचा शिरपूर येथे झालेल्य प्रथम सेमिनार आहे. ज्यामध्ये ११० विद्यार्थिनिनी /ब्युटीशियननी भाग घेतला.
सदर सेमिनारसाठी स्वयंम सिद्धम संस्थेचे चेअरमन परिक्षित सोनी, नागपूर, ऑर्गनायझर रमेश पाटील, धाराशिव, ज्योती राजे निंबाळकर, धाराशिव, माधवी पारेख, मुरुड व शिरपूर सेमिनार ऑर्गनायझर धनश्री मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच सलीम अन्सारी, मुंबई हेअर आर्टिस्ट यांनी हेअर स्टाईलचा डेमो दाखविला. या सेमिनार मुळे पुढच्या सेमिनारसाठी अनुजा मेकअप स्टुडिओ, कळंब जिल्हा धाराशिव यांना बोलविण्यात आलेले आहे.