दिव्यांगांसाठी कमोड टॉयलेट अर्ज संकलन शिबिर संपन्न
राहुरी – दिव्यांग शक्ती सेवा संस्था व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी कमोड टाँयलेट बसविणेबाबत अर्ज भरणे या उपक्रमाअंतर्गत शिबीराचे आयोजन करून राहुरी नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना लाभ देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. लवकरच राहुरी नगरपरिषद व तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून दिव्यांगांना कमोड टॉयलेट मिळवून देणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.
सदर शिबिर मिनी आय.टी. आय. राहुरी येथे घेण्यात आले. तसेच योगेश लबडे यांना वाढदिवसानिमित्त सर्वच उपस्थित पदाधिकारी तथा दिव्यांग सैनिकांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून योगेश लबडे यांनी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस विविध उपक्रमासाठी १००० रुपये रक्कम देणगी दिली. दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने तालुक्याचे उपाध्यक्ष विठ्ठल पांडे यांनी योगेश लबडे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे राहुरी तालुका राबवित असलेले दिव्यांगांप्रती स्नेहपुर्ति वाढदिवस सर्वत्र बहुचर्चित झाले असून इतरांना मार्गदर्शक ठरत आहेत.
यावेळी तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, तालुका समन्वयक ह भ प नानामहाराज शिंदे, ता.संघटक भास्कर दरंदले, टाकळीमिया शाखाध्यक्ष सुरेश दानवे, माहेगाव शाखाध्यक्ष भारत आढाव, गोटुंबा आखाडा शाखा उपाध्यक्ष हभप आदिनाथ दवने महाराज, बा. नांदूर शाखाध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष प्रतिक धिमते, राहुरी शहर सचिव जुबेर मुसानी, संदीप कुलकर्णी, कोळेकर काका, अनिल तनपुरे, सागर जगधने, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी आदी उपस्थित होते. सदर शिबिरास दिव्यांगांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.