सामाजिक

दिव्यांग स्वाभिमानदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – मधुकर घाडगे

राहुरी : शुक्रवार, दि. 5 जुलै 2024 रोजी सकाळी 9:00 वा. रोटरी क्लब ब्लड बँक, राहुरी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य ना. बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस दिव्यांग स्वाभिमान दिन म्हणून साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने “भव्य रक्तदान शिबिर” तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या व शालेय उपयोगी वस्तू संकलित करून त्याचे वाटप व वृक्षरोपण शिबिर कार्यक्रम तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने आयोजित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रक्ताची खूप कमतरता आहे, म्हणून बच्चुभाऊ कडू यांनी 31 मे ते 5 जुलै दरम्यान रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. रक्तदान हे जीवदान आहे जास्तीत जास्त तरुण बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले आहे.

या बैठकीदरम्यान जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, तालुकाध्यक्ष योगेश लबडे, महिला तालुकाध्यक्ष छायाताई हारदे, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका उपाध्यक्ष माणिक तारडे पाटील, तालुका संघटक राजेंद्र आघाव, ह.भ.प नानासाहेब शिंदे, भास्कर दरंदले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button