कृषी

जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ व शेतकरी रवाना

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे शास्त्रज्ञ व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपुर-मध्यप्रदेश येथे बोरलॉग इंन्स्टिट्युट ऑफ साउथ एशिया (बीसा) या संस्थेत 20 शास्त्रज्ञ व 12 शेतकरी असे एकुण 32 प्रशिक्षणार्थींची दुसरी तुकडी रवाना झाली आहे.

या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्स्टिट्युटचे प्रमुख डॉ. रवी गोपालसिंग व त्यांचे सहकारी डॉ. प्रभात कनुजे आणि डॉ. विवेक सिंग हे प्रशिक्षण देणार आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे सुचनेनुसार व माजी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी जाणार्या या दुसर्या तुकडीच्या बसला कृषि अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख व आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे यांनी निरोप दिला.

यावेळी डॉ. मुकुंद शिंदे म्हणाले की या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या सिंचन पध्दतींमध्ये केलेला सोलरचा उपयोग या संबंधीचा अभ्यास करता येणार आहे तसेच सौर उर्जेचा सिंचन पध्दतींमध्ये होणार्या वापराविषयी जागृती होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील कदम व संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button