सामाजिक

वाढदिवसानिमित्त बाल वाचनालयास पुस्तके भेट

आदर्श पाडेकर याचा वाढदिवस शाळेत उत्साहात साजरा

राहुरी | जावेद शेख : जिल्हा परिषद शाळा नवलेवाडी, ता. अकोले येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु. आदर्श महेश पाडेकर याने त्याच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या बाल वाचनालयास प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन अनोखा वाढदिवस साजरा केला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, डिजिटल जगात मुलांचे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शाळेतील पहिलीचे वर्गशिक्षक भरत सदगीर यांनी बाल वाचनालय जिल्हा परिषद शाळेत सुरू केले आहे. त्याच पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचता यावे या प्रेरणेने कु. आदर्श महेश पाडेकर याने शाळेच्या बाल वाचनालयात विविध प्रेरणादायी गोष्टींचे पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विनयशीला शिंदे, उपक्रमशील वर्गशिक्षक भरत सदगीर, सोमनाथ वाजे आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांनी कु.आदर्श पाडेकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button