पैठण तालुक्यात ठिकठिकाणी कायदेविषयक शिबिर संपन्न
न्यायाधिश एस. एम. भावसार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व न्यायाधीश व्ही. एस. वाघ व एस. आर. गुळवे, यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तयार करुन पैठण तालुक्यातील कातपुर वाहेगाव, इसारवाडी, ढोरकीन, आपेगाव, उचेगाव, नवगाव व टाकळी अंबड या गावामध्ये जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमामध्ये नागरीकांना विधी सेवा समितीच्या कार्याविषयी माहितीपत्रक वाटप करण्यात आले. येत्या २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये समझोतायोग्य प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास ॲड. सय्यद, ॲड. एस. एल. जाधव, ॲड. एस. एस. जाधव, ॲड. व्ही. आर. चव्हान, ॲड. सी. आर. कुलकर्णी, ॲड. विजय मुळे, ॲड. वाकडे, ॲड.जी. एस. काकडे, ॲड.के. के. चव्हान, ॲड. गव्हाणे,ॲड. पहिलवान, ॲड. पी. पि . काकडे, ॲड. खडसन, ॲड. उगले, ॲड. बोबडे, ॲड. नवले, ॲड. मिसाळ, ॲड. औटे, ॲड. सोनवणे व ॲड. जोशी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.