अहमदनगर

नेपियर गिन्नी गवतापासुन बनवणार जैविक इंधन : ढवण

व्हिडीओ : नेपियर गिन्नी गवतापासुन बनवणार जैविक इंधन.
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यात लवकरच जैविक इंधन प्रकल्प उभारला जाणार आहे.या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला कच्चा माल हत्ती गवताच्या जातीतील सुपर नेपियर गिन्नी गवतापासुन जैव इंधन निर्मिती करणार असल्याची माहिती पारनेर एम.सी.एल.आरगॅनिक्सचे अध्यक्ष संतोष ढवण यांनी दिली आहे.

    राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी मच्छिंद्र चव्हाण व अमोल धसाळ यांनी लागवड केलेल्या हत्ती गवताच्या जातीतील सुपर नेपियर गिन्नी गवत विकसीत वाणाची दिलीप ढवण,रंगनाथ ढवण,महेश महाराज खाटेकर,सुनिल महाराज पारे,गणेश भांड,बापुसाहेब भुसे,स्वप्निल पेरणे,अविनाश घाडगे,महेद्र आढाव,सागर पेरणे आदींनी पाहणी केली.


आज संपूर्ण जग प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्याच्या ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनेक संशोधन करून आवश्यक पावले उचलत आहे. या क्रमाने, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारतात लवकरच जैवइंधन तयार करणार आहे. हे इंधन स्वयंपाकापासून ते औद्योगिक क्षेत्रासाठी देखील वापरले जाऊ शकते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अशा स्वरुपाचे प्रकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात निर्मितीचे स्वप्न आहे.



संतोष ढवण,पुढे म्हणाले की तालुक्यात लवकरच जैविक इंधन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार असल्याने हा प्रकल्प भविष्यात शेतकर्यांना वरदान ठरणार असुन दहा हजार सभासद झाल्यानंतर या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याचे बोलले.यासाठी प्रत्येक सभासद शेतकऱ्यांना हत्ती गवताच्या जातीतील सुपर नेपियर गिन्नी गवत विकसीत वाणाची लागवड करावी. या गिन्नी गवतापासुन ९० दिवसात एकरी ४० ते ५० टनाचे उत्पादन मिळते. गिन्नी गवत शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये प्रती टन या प्रमाणे खरेदी केले जाणार आहे. कमी खर्चात एकरी २ लाख रुपये उत्पादन मिळेल. तसेच या माध्यमातुन शेतकर्याला वार्षिक डिवीडन वाटप, गॅस मध्ये डिस्काउंड, मोफत खते असे अनेक फायदे असल्याने हा प्रकल्प शेतकर्यांना वरदायी ठरणार आहे. या प्रकल्पातुन बेरोजगारांना रोजगार निर्माण होणार आहे.

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना या जैव इंधन प्रकल्पाचा निश्चितच लाभ होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांनी स्वयं स्फुर्तीने सभासद नोंदणी अभियानात सहभाग घ्यावा.जेणेकरून लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होण्यास मदत होईल,असे आवाहन आरगॅनिक्सचे महेश महाराज खाटेकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button