औरंगाबाद

मानवाच्या विकासाबरोबर भाषा विकसित होत गेली- डॉ. संतोष चव्हाण

विजय चिडे/पाचोड : येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये मराठी भाषा विभागाअंतर्गत वाड्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्तविक प्रसंगी डॉ.संतोष चव्हाण यांनी भाषा ही कशी विकसित होत गेली. यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
दरम्यान मानव जसजसा विकसित होत गेला. त्याबरोबरच भाषा देखील विकसित होत गेली. मानव सुरुवातीस चित्राची भाषा, अंगीक हावभावाची भाषा वापरत होता. त्यानंतर काही सांकेतिक चिन्हाचाही भाषेसाठी उपयोग करत असे, परंतु यामध्ये अनेक अडथळे येऊ लागल्यामुळे मानवाने लिपीची भाषा वापरण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भाषा कशी विकसित झाली याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गांधी बनायत यांनी मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजी यादव हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास महाजन होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश नलावडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे यांनी केले तर आभार डॉ. भगवान जायभाये यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.सुभाष पोटभरे, प्रा.हेमंत जैन, प्रा.सचिन कदम प्रा.संदीप सातोनकर, प्रा.उत्तम जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button