अहमदनगर

राज्यमंत्री तनपुरेंमुळे मुळानगर काॅलनीचा बंद पाणी पुरवठा सुरू

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीमुळानगर काॅलनीतील पाणी पुरवठा गेले आठ दिवसापासून बंद होता, मूळानगर येथे कुठलाही ग्रामपंचात निधी उपलब्ध नसल्याने कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नव्हता. हा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख व प्रवीणजी लोखंडे यांनी त्वरित इरिगेशन अधिकारी सायली पाटील व आंधळे रावसाहेब यांच्याशी चर्चा केली.तसेच नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी मुळानगर पाणीप्रश्नावर सलीमभाई शेख यांनी गंभीर चर्चा केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी इरिगेशन अधिकारी यांना त्वरित सहकार्य करण्याचे आदेश दिले. मुळानगर ग्रामस्थांना पाण्याची मोटार, स्टार्टर, आणि वायर केबल उपलब्ध करून पाणी योजना सुरळीत चालू करण्यास सांगितले.त्यामुळे आज मुळानगर पाणी योजना मोटार, स्टार्टर, वायर इत्यादी साहित्य इरिगेशन अधीकारी यांनी दिले आहे. ना.तनपुरे, इरीगेशन अधिकारी व सलीमभाई शेख यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.याकामी महिला ग्रामपंचायत सदस्य प्रियंका त्रिभुवन यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. याप्रसंगी आदिवासी नेते कैलास बर्डे, दिलीप बर्डे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील माळी, सदस्य मुन्नाबाई परदेशी, राजेश परदेशी, एकनाथ गायकवाड,माळी सर ,अशोक गायकवाड, किशोर पवार, साहिल शेख, दीपक नावसरे, सागर गायकवाड, सुनील शेख, मनोज मामा, रमेश निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button