अहमदनगर

जिल्ह्यात लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार – खा. लोखंडे यांची माहिती

नवी दिल्ली : नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यातही मिळण्यासाठी अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधीतांना दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली.

श्री. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. श्री. लोखडे यांनी श्री. गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या 24.03 रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र, अहमदनगर (शिर्डी) येथे याच कांद्याचे 20.75 प्रैसे प्रतिकिलो आहे, ही तीन रुपयांची नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधीतांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. 24.03 प्रति किलो प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली.

दुसरी महत्वाची मागणी अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करावी ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button